हेमंत मराठे यांना पितृशोक

Edited by: प्रतिनिधी
Published on: October 10, 2022 10:52 AM
views 501  views

सावंतवाडी  : मळेवाड गावचे रहिवासी आणि प्रसिध्द ज्योतिषी रमाकांत सदाशिव मराठे (८४) यांचे रविवारी मध्यरात्री दुःखद निधन झाले. मळेवाड कोंडूरे गावचे उप सरपंच तथा पत्रकार हेमंत मराठे यांचे ते वडील होत.

रमाकांत मराठे हे पंचक्रोशी आणि गोवा येथे विख्यात ज्योतिषी म्हणून प्रसिध्द होते. तसेच सामाजिक कार्यातही त्यांचा सहभाग होता. सुरुवातीच्या काळात मराठे हे गोवा येथे महसूल खात्यात कामाला होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मूलगे, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.