
वेंगुर्ले : वेंगुर्ले कॅम्प येथील रहिवासी श्रीमती वासंती गुरुनाथ वालावलकर (वय ८०) यांचे आज २८ ऑक्टोंबर रोजी मुंबई येथे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली, जावई, सूना, नातवंडे असा परिवार आहे. वेंगुर्ला येथील सामाजिक कार्यकर्ते, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे वेंगुर्ला शहर प्रमुख तथा शिक्षण मंत्री दीपक केसरकर समर्थक सचिन वालावलकर यांच्या त्या मातोश्री होत. तसेच लक्ष्मी नारायण महा ई सेवा केंद्र चालक समिक्षा सचिन वालावलकर यांच्या त्या सासू होत.