
सावंतवाडी : दि. १२ जानेवारी २०२३ रोजी संशयित आरोपी क्र. (१) ऋतुश सुरेश माजीक, रा. राजारामपुरी, कोल्हापूर. (२) नरेंद्र उर्फ सागर प्रकाश नलवडे, रा. मंगळवारपेठ, कोल्हापूर, (३) अमोल गणपती पोतदार, रा. रा. मंगळवारपेठ, कोल्हापूर यांनी सावंतवाडी येथील बँकेत आपलेजवळ सोने आहे असे सांगून २ लाख पर्यंत कर्जाची मागणी केली. बँकेतील स्टाफने बँकेचे सोनारामार्फत सदर दागिन्यांची तपासणी केली असता ते सोने बनावट असल्याचे आढळून आहे. सदर प्रकरणी बँकेने गु.र.नं. १२/२०२३ भा.दं.वि. कलम ४१७, ४२०, ३४ प्रमाणे सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविणेत आला. आरोपी नं. १ यास दि.१४/०१/२०२३ रोजी व आरोपी नं. २ व ३ यांना दि. १६/०१/२०२३ रोजी अटक करण्यात आली.
आरोपी नं. १ यास दि. १४/०१/२०२३ रोजी अटक करुन दि. १४/०१/२०२३ रोजी मे.कोर्टात हजर केले असता त्यांना दि. १६/०१/२०२३ पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केलेली होती. तर आरोपी नं. २ व ३ यांना दि. १६/०१/२०२३ रोजी अटक करुन मे. कोर्टात हजर केले असता त्यांना दि. १८/०१/२०२३ पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केलेली होती. आरोपी नं.२ यास दि.१८/०१/२०२३ रोजी पुन्हा न्यायालयात हजर करुन न्यायालयीन कोठडीची मागणी करणेत आली.. दि.१८/०१/२०२३ रोजी आरोपी नं.२ मे. कोर्टात हजर केले असता आरोपी नं.२ तर्फे अॅड. परशुराम बाबुराव चव्हाण यांनी जामीन अर्ज दाखल करुन, त्यावर युक्तीवाद केला. आरोपी नं. २ तर्फे करण्यात आलेला युक्तीवाद ग्राहय मानून आरोपी नं. २ याची दर चौथ्या शनिवारी पोलीस स्टेशनला हजेरी लावण्याच्या अटीवर रक्कम रु.१५,०००/- (रुपये पंधरा हजार मात्र) च्या सशर्त जामीनावर मुक्तता करण्यात आली. आरोपी नं. २ तर्फे अॅड. परशुराम बाबुराव चव्हाण यांनी काम पाहिले.