
सावंतवाडी : गोव्याहून मुंबईच्या दिशेने होणाऱ्या बेकायदा दारु वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुबंई-गोवा महामार्गावर इन्सुली खामदेव नाका येथे कारवाई केली. पथकाने कारवाई करत तब्बल ७१ लाख ५८ हजार रुपये किंमतीच्या दारुसह एकूण ८६ लाख ५८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी चालक ज्योतिबा परशुराम गावडे (३० रा. शिवाजीनगर बेळगाव) याच्यांवर बांदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली.
त्यांच्यावर महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 65 ( अ, ई), अन्वये 11 ऑक्टोबर 2023 रोजी गुन्हा नोंदवून कारवाई करण्यात आलेली होती. त्यांना सावंतवाडी येथील न्यायालयात ११ ऑक्टोबर २०२३ रोजी हजर केले असता त्याला एक दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. त्यांना पुन्हा सावंतवाडी येथील न्यायलयात दिनांक १२ ऑक्टोबर २०२३ रोजी हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली. आरोपीतर्फे ॲङपरशुराम चव्हाण यांनी युत्कीवाद केला. आरोपीतर्फे अॅड. परशुराम चव्हाण यांनी न्यायालयात जामिन अर्ज दाखल करुन त्यावर केलेला युक्तीवाद ग्राह्य मानुन न्यायालयाने आरोपी यास रक्कम रु.२५,०००/-(रुपये पंचवीस हजार) चा सशर्त जामिन मंजूर करण्यात आला. आरोपी तर्फे अॅड परशुराम चव्हाण यांनी काम पाहिले.