
दोडामार्ग : हत्ती प्रश्नाबाबत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकारामुळेच गेल्या कित्येक वर्षात पहिल्यांदाच आपत्तीग्रस्त स्थानिक शेतकरी, वनमंत्री, पालकमंत्री, स्थानिक आमदार व वन विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी यांची संयुक्त बैठक झाली. यावेळी वनमंत्री सुधीर मुंणगंटीवार यांच्यामुळे हत्ती प्रश्न सोडविण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याबाबत निर्णय झाल्याची माहिती भाजपा जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी व तालुकाध्यक्ष सुधीर दळवी यांनी दिली.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहॆ की, गेल्या वीस वर्षात दोडामार्ग तालुकावासिय हत्ती प्रश्नामुळे मेटकुटीस आले आहेत. स्थानिक आमदार यांना गेल्या 14 वर्षात या प्रश्नावर तोडगा काढता आला नाही. स्थानिकांनी अनेकदा आंदोलन केली तरी हा प्रश्न सुटला नाही. पालकमंत्री चव्हाण यांनी पुढाकार घेऊन वनमंत्र्यांसोबत बैठक घेतली. गेल्या कित्येक वर्षात पहिल्यांदाच आपत्तीग्रस्त स्थानिक शेतकरी, वनमंत्री, पालकमंत्री, स्थानिक आमदार व वन विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी यांची संयुक्त बैठक झाली. स्थानिक आमदार दीपक केसरकर यांच्या निष्क्रियतेमुळे हत्ती प्रश्नामुळे जनता बेजार झाली. जीवघेण्या प्रश्नांवर ठोस उपाययोजना केली नाही. अखेर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी पुढाकार घेउन हत्ती हटाव प्रश्नाबाबत वनमंत्री मुनटीवार यांच्या दालनामध्ये बैठक झाली. यावेळी मुनगंटीवार यांनी गणेश चतुर्थी पूर्वी हत्तीप्रश्न मार्गी लावण्यासाठी कालबद्ध उपाययोजना करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. माजी आमदार राजन तेली यांच्या पाठपुराव्यामुळे ही बैठक झाली. यावेळी वन विभागाशी समन्वय ठेऊन हत्ती प्रश्न मार्गी लावण्यासाठीची जबाबदारी वनमंत्र्यांनी श्री. तेली यांच्यावर दिली आहॆ. बैठकीत पालकमंत्री चव्हाण यांनीही आक्रमक भूमिका घेत अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. गुळमुळीत उत्तर देऊन शेतकऱ्यांची चेष्टा करणाऱ्या अधिकाऱ्यांची चव्हाण यांनी बोलती बंद केली. गेली चौदा वर्षे आमदार, मंत्री, पालकमंत्री होऊन दिपक केसरकर करू शकले नाही ते पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण यांनी मंत्रालयात वनमंत्र्यासोबत बैठक शेतकऱ्यांसमवेत बोलावून करून दाखवलं.त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहॆ. नुकसान भरपाईची रक्कम देखील चारपट वाढवून देण्याची सूचना वनमंत्र्यांनी केली आहॆ. पालकमंत्री चव्हाण व राजन तेली यांनी वनमंत्र्यासमोर मांडल्याने आता हत्ती प्रश्न सुटण्याचा मार्गांवर आहॆ. या संपूर्ण उपाययोजनेबाबत श्री. तेली समन्वयक म्हणून काम करणार असल्याने निश्चितच ठोस उपाययोजना होतील. या बैठकीत हत्ती हटाव मोहिमेसाठी आसाम मधील प्रशिक्षक आणून दोन वर्षे या जिल्यात ठेऊन हत्तीचा कायमचा बंदोबस्त करणे, ज्या ठिकाणाहून (मार्ग ) मधून हत्ती येतात ती ठिकाणे कायमची बंद करणे, हत्ती तसेच वन्यप्राण्यापासून होणा-या बागायतीचे नुकसान आताच्या वाढीव दराने म्हणजे रस्तेसाठी देण्यात येणा - या दराचा विचार करणे व त्यानुसार नुकसान भरपाई देणे, हत्तीना राखीव संवर्धन क्षेत्रामध्ये ठेवण्याबाबत काय उपाय योजना करता येईल याबाबत निर्णय घेणे. तसेच लोकांच्या शेतात हत्ती येणार नाही यासाठी राखीव क्षेत्रामध्ये त्याचे खाद्ये तयार करणे. अश्या अनेक सूचना देऊन आठ दिवसामध्ये या सर्व विषयावर निर्णय घेण्याचे आदेश वनमंत्री यांनी दिलेले आहेत.