गोगटे वाळके महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा विशेष बॅच सुरू : डॉ. रमाकांत गावडे

Edited by:
Published on: July 01, 2024 14:09 PM
views 58  views

बांदा  :  शिक्षण प्रसारक मंडळाच्या  गोगटे  वाळके  महाविद्यालयात चालू शैक्षणिक वर्षापासून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची विशेष बॅच तयार करण्यात आली असून कला, वाणिज्य व विज्ञान विभाग प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या बॅचसाठी प्रवेश देणे सुरू आहे. कोकणातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची मूलभूत तयारी करून घेण्याची संधी मिळत नाही त्यामुळे उच्च शिक्षण घेऊनही येथील विद्यार्थीटे -वाळके (बांदा ) वर्ग १, वर्ग २ व वर्ग ३ च्या परीक्षेत मागे राहतात याचा विचार करून शिक्षण घेतानाच स्पर्धा परीक्षांची आवड व तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी महाविद्यालयात उपलब्ध करून दिली आहे. या स्वतंत्र बॅचमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची सतत तीन वर्षे स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेतली जाणार आहे त्यासाठीऑनलाईन  पद्धतीने रोज दोन  तास तज्ञ  मार्गदर्शन करणार  आहे. या  साठी उच्चं व तंत्र शिक्षण  विभागा मार्फत चालवीला  जाणारा "करिअर कट्टा" हा  उपक्रम   राबविला  जाणार  आहे  त्याशिवाय  स्पर्धा  परीक्षा  विभागा मार्फत वेळोवेळी मार्गदर्शन  पण  केले  जाणार  आहे. प्रथम वर्ष कला,वाणिज्य, आणि  शास्त्र च्या  मुलांना  हे  सक्तीचे  केलेले  आहे.  या साठी  नाममात्र  फी आकारण्यात  येईल.

 या  बरोबरच  उदयोजक  आपल्या दारीं  म्हणजेच  रोज  एक तास  उदयोजकांशी  संवाद  साधण्याची  संधी  मिळणार  आहे. नियमित अभ्यासक्रमाबरोबरच या बॅचमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असलेले भाषा, सामान्य ज्ञानं, तांत्रिक विषय, चालू घडामोडी, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, तंत्रज्ञान, मूलभूत संगणकीय ज्ञान, बुद्धिमत्ता, तर्कशास्त्र असे विविध विषय व महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अभ्यासक्रमानुसार तज्ज्ञ मान्यवरांची   व्याख्याने  आयोजित  करून स्पर्धा परीक्षेसाठी विशेष तयारी करून  घेतली  जाईल.    या  मधील सर्व  सहभागी मुलांना  गोवा  येथील थिंकर फौंडेशन वर्षभर इंग्लिश आणि इतर  दोन  परकीय ( फ्रेंच आणि रशियन ) भाषा  अवघ्या 312 रुपयामध्ये शिकविणार  आहे. या उपक्रमात  परिसरातील  माजी  विद्यार्थी  भाग  घेऊ  शकतात.   तरी  सर्वानी  आवश्य  प्रवेश घ्यवा असे आवाहन प्राचार्य  डॉ. गोविंद  काजरेकर यांनी केले आहे. अधिक  माहितीसाठी या  विभागाचे प्रमुख  डॉ. रमाकांत गावडे यांच्याशी 9421090965 या क्रमांकावर संपर्क साधावा.