
सावंतवाडी : महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागा अंतर्गत एकूण 8169 पदांसाठी महाराष्ट्र लोक सेवा आयोगा मार्फत 30 एप्रिल 2023 रोजी पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत दिनांक 25 जानेवारी 2023 ते 14 फेब्रुवारी 2023 पर्यंत असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना सावंतवाडी विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मोफत अर्ज भरून देण्याची व्यवस्था यशवंतराव चव्हाण सेंटर, सावंतवाडी याठिकाणी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी आवश्यक कागदपत्रे घेऊन येऊन तसेच फक्त परीक्षा शुल्क भरून आपला अर्ज दाखल करून नोंदणी करावी असे आवाहन राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग अध्यक्ष अर्चना घारे परब यांनी केले आहे. नोंदणी केलेल्या उमेदवारांना मोफत मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी 9850063006 या क्रमांकावर संपर्क साधावा असेही यावेळी सौ. अर्चना घारे यांनी सांगितले