वेंगुर्ला तालुका खरेदी विक्री संघाच्या वतीने शासनाच्या भात खरेदीचा शुभारंभ

जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून झाला प्रारंभ
Edited by: दीपेश परब
Published on: December 03, 2022 14:08 PM
views 262  views

वेंगुर्ला : वेंगुर्ला तालुका खरेदी विक्री संघाच्या वतीने शासनाच्या भात खरेदीचा शुभारंभ जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.

यावेळी खरेदी विक्री संघाचे चेअरमन एम. के. गावडे, नवनिर्वाचित संचालक ज्ञानेश्वर केळजी, कर्मचारी वैभवी तळकर, विकास कुबल, प्रदीप राणे, हेमंत नाईक, शेतकरी मनोहर कुबल, बाळा कुबल, मंदार वेंगुर्लेकर आदी उपस्थित होते. तालुक्यात एकूण ४२१ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून भात खरेदी पूर्वी दिवस निश्चित करण्यात यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.