साळशीतील विद्या मंदिर शाळेच्या इमारत बांधकामास सुरूवात

Edited by: नागेश दुखंडे
Published on: November 20, 2023 15:53 PM
views 160  views

देवगड : देवगड साळशी येथील माध्यमिक विद्यामंदिर शाळेच्या नूतन इमारतीच्या बांधकामाची सुरूवात साटम सर यांच्या हस्ते श्रीफळ वाढउन करण्यात आली.शाळेची इमारत गेली कित्तेक वर्षे जुनी असल्याने त्या इमारतीचे छप्पर तसेच इ मारतीच्या खिडक्या सर्व कमकुवत व मोडकळीस आल्या होत्या . या शाळेतील पाल्य तसेच शिक्षक वर्ग यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मोठा प्रश्न निर्माण झाला होता.त्यामुळे या शाळेच्या इमारतीच्या बांधकाम होणे आवश्यक होते.त्यासाठी 10 लाख रुपयांची आवश्यकता होती. 

या शाळेसाठी साळशी चे सुपुत्र  किशोर लाड यांच्या प्रयत्नातून त्याच प्रमाणे बॅंकेचे अधिकारी माधवी दीक्षीत, कार्तिक मोदी या सर्वांच्या सतत च्या पाठपुराव्यामुळे चार्टर्ड स्टॅण्डर्ड बॅंक, मुंबई यांच्या कडून या शाळेच्या इमारतीस पैशांचे पाठबळ मिळाले व त्यामुळे या शाळेच्या इमारत बांधकामास उद्घाटन करून सुरूवात करण्यात आली. या वेळी स्कूल कमिटी चेअरमन सत्यवान सावंत, सल्लागार सुनील गांवकर, संस्था उपाध्यक्ष प्रभाकर साळसकर, संस्था सदस्य विजय सुतार, संतोष साळसकर, प्रकाश रावले, रमेश नाईक, कंत्राटदार तसेच अन्य मान्यवर, सहाय्यक शिक्षक मराठे ,साटम, शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग आदी उपस्थित होता.