आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत आचरेत शिवसेना पदाधिकाऱ्यांची निवड

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: November 10, 2023 17:51 PM
views 500  views

मालवण : शिवसेना पक्षाच्या आचरा शहरप्रमुख पदी माणिक राणे, उप शहरप्रमुख पदी छोटू पांगे,उप शहरप्रमुख पदी भाऊ  परब, युवासेना उप शहरप्रमुख पदी अक्षय पुजारे यांची निवड करण्यात आली आहे. आमदार वैभव नाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

आ. वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत आचरा येथील शिवसेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व शिवसैनिकांची बैठक आचरा येथे पार पडली. यावेळी शिवसेना संघटनावाढीबाबत चर्चा करण्यात आली. तसेच मतदारांचे आभार मानण्यात आले. आचरा ग्रा. प. निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्या अनुष्का गावकर व सदस्या पूर्वा तारी यांचे आ. वैभव नाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी  मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी बांधकाम सभापती मंदार केणी यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी चंदन पांगे, नितीन घाडी, भाऊ परब, उदय दुखंडे, चंद्रकांत गोलतकर, माजी सरपंच मंगेश टेमकर, सदांनद घाडी, शाम घाडी, अरविंद घाडी, सचिन परब, सचिन बागवे, विजयराज शेंडगे, अनिकेत मांजरेकर, आशु मयेकर, दिलीप कावले, प्रवीण मुणगेकर, संजय वायंगणकर, शेखर मुणगेकर, युगंधरा मोर्ज, प्रशांत गांवकर, प्रिया मेस्त्री, श्रद्धा सक्रू आदिंसह आचरा येथील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.