आ. वैभव नाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रमोद मसुरकर यांनी दिला टीव्ही संच भेटवस्तू

Edited by: उमेश बुचडे
Published on: March 20, 2023 15:01 PM
views 265  views

कणकवली : कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कणकवली शहर प्रमुख प्रमोद मसुरकर यांनी कणकवली मध्यवर्ती कार्यालयासाठी टीव्ही संच भेट म्हणुन शिवसेना नेते सतीश सावंत यांच्याकडे सुपूर्द केला.

यावेळी महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत पालव, युवा तालुका प्रमुख शैलेश भोगले, सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक,नगरसेवक कन्हैया पारकर,राजू राठोड,वैदेही गुडेकर, माधवी दळवी,संजना कोलते, दिव्या साळगावकर,तेजस राणे, जय शेट्ये,निसार शेख,महेश कोदे  आदी उपस्थित होते.