
वैभववाडी : आ.नितेश राणे यांना निरोगी दीर्घायुष्य लाभावे यासाठी वैभववाडी भाजपा महिला आघाडीच्या वतीने दत्तमंदिरात अभिषेक करण्यात आला.आपल्या नेत्याला दिर्घायुष्य लाभावे यासाठी देवाला साकडे घातले.
आ. नितेश राणे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.या वाढदिवसानिमित्त भाजपा महिला पदाधिकाऱ्यांनी शहरातील दत्त मंदिरात अभिषेक केला.यावेळी तालुका अध्यक्षा प्राची तावडे, स्नेहलता चोरगे,सीमा नानीवडेकर,हर्षदा हरयाण,शारदा कांबळे, नगरसेविका यामिनी वळवी,संगीता चव्हाण आदी महीला पदाधिकारी उपस्थित होत्या.