आ. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार | माजी नगरसेवक संतांजी रावराणे यांच आयोजन | मनिष दळवी यांची खास उपस्थिती

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: June 22, 2023 18:28 PM
views 83  views

वैभववाडी : आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त माजी नगरसेवक संताजी रावराणे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित केला आहे.महाराणा प्रतापसिंह कलादालनात शुक्रवार दि २३ जून रोजी सकाळी ११ वा  हा कार्यक्रम होणार आहे.

     आ.नितेश राणे यांचा २३जून रोजी वाढदिवस आहे. हा वाढदिवस तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून साजरा करण्यात येणार आहे. या वाढदिवसाचे औचित्य साधून संताजी रावराणे यांच्या वतीने १० वी व १२ परीक्षेत उत्कृष्ट गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात येणार आहे. तसेच नगरपंचायत हद्दीतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्यासहीत वह्यांचे वाटप केले जाणार आहे.

गेली सहा वर्षे आमदारांच्या वाढदिवसानिमित्त श्री रावराणे हे विविध उपक्रम राबवित आहेत. याही वर्षी गुणवंतांचा सत्कार सोहळा आयोजित केला आहे. येथील कलादालनात हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, कणकवली माजी सभापती मनोज रावराणे हे उपस्थित राहणार आहेत. तालुक्यातील  गुणवंत विद्यार्थी, पालक यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन श्री.रावराणे यांनी केले आहे.