आ. नितेश राणेंच्या उपस्थितीत उंबर्डे - पडेल आरोग्य केंद्रांच्या रुग्णवाहिकांचं लोकार्पण...!

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: September 27, 2023 13:35 PM
views 264  views

सिंधुदुर्ग :  प्राथमिक आरोग्य केंद्र पडेल, देवगड प्राथमिक आरोग्य केंद्र उंबर्डे, वैभववाडी या दोन आरोग्य केंद्रांना जिल्हा नियोजन मधून मिळालेल्या निधीतून खरेदी करण्यात आलेल्या रुग्णवाहिकांचे लोकार्पण आ. नितेश राणे यांच्या उपस्थितीत, जिल्हाधिकारी किशोर तावडे व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सई धुरी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे, जिल्हा परिषद उप मुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन किशोर काळे, जिल्हा बॅंक अध्यक्ष मनीष दळवी आदी उपस्थित होते.