सिंधुदुर्गच्या कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांची बदली

सिंधुदुर्गचे नवे जिल्हाधिकारी म्हणून किशोर तावडे यांची नियुक्ती
Edited by:
Published on: August 22, 2023 14:19 PM
views 1598  views

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांची कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त पदी बदली झाली आहे. त्यांच्या जागी सिंधुदुर्गचे नवे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची नियुक्ती झाली आहे. के मंजुलक्ष्मी तब्बल साडे पाच वर्षे सर्वाधिक काळ जिल्ह्यात प्रशासकीय कारभार करणाऱ्या अधिकारी ठरल्या आहेत. कोरोना काळातील त्याचे कार्य सर्वोत्तम ठरले आहे . कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त कादंबरी बलकवडे यांची पुणे येथे बदली झाल्यानंतर त्यांच्या रिक्त जागी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांना नियुक्ती शासनाने केली आहे.

के. मंजुलक्ष्मी ह्या ९ फेब्रुवारी २०१८ ला सिंधुदुर्ग मध्ये जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी रुजू झाल्या त्यानंतर दोन वर्षानी सिंधुदुर्ग मधेच २० मे २०२० रोजी जिल्हाधिकारी पदी शासनाने नियुक्ती केली.

त्यानंतर आता त्यांची बदली झाली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून दोन वर्ष आणि जिल्हाधिकारी म्हणून तीन वर्ष सहा महिने त्या राहिल्या आहेत. आजवरच्या अधिकाऱ्यांमध्ये सर्वाधिक काळ त्या जिल्ह्यात राहिल्या आहेत. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी पदी जिल्ह्यात काम केलेल्या पाच अधिकाऱ्यांना जिल्ह्यातच जिल्हाधिकारी पदी बढती मिळाली. त्यातही के. मंजुलक्ष्मी या सर्वाधिक काळ जिल्ह्यात राहिल्या आहेत.