भावपूर्ण वातावरणात ताबूत विसर्जन...!

Edited by: विनायक गावस
Published on: July 30, 2023 11:50 AM
views 230  views

सावंतवाडी : शहरामध्ये सात ठिकाणी मोहरम निमित्त पिरांचा उत्सव होतो. त्यामध्ये सरदार निंबाळकर पीर, तहसीलदार पीर, सय्यद पीर, म्हाताचे पीर, जलाल शहा पीर, पटवीचे पीर, काझीचे पीर असे आहेत. हिंदू - मुस्लिम एकतेचे प्रतिक असलेल्या या सणाची सांगता शनिवारी झाली.

मोहरमच्या शेवटच्या दिवशी भक्तिमय वातावरणाने या उत्सवाची सांगता करण्यात आली. फेरीच्या वेळी हा निंबाळकर पीर सालईवाडा येथून मार्गक्रमण करत थेट कळसुलकर इंग्लिश स्कूल मधील भवानी मंदिरा समोर सलामी देऊन पुढे गेला. सर्व धर्मियांकडून गुळाचा नैवेद्य ठेवून दर्शन घेतल़ जात. मुस्लिम धर्मियांच्या या मोहरम उत्सवाची सांगता शनिवारी सायंकाळी झाली. हजरत मोहम्मद पैगंबर यांचे नातू हसेन आणि हुसैन हे दोघेही करबला येथे शहीद झाले होते. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मुस्लिम बांधव या दिवशी शोक व्यक्त करतात.