
सावंतवाडी: महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर मित्र मंडळाच्यावतीने सावंतवाडीत विविध उपक्रम राबविले जाणार आहे. कॅन्सर निदान शिबीर आणि रक्तदान शिबिराचे आयोजन एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले आहे. गुरुवारी 9 फेब्रुवारीला सकाळी दहा वाजता सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये या शिबिराच आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापूर येथील कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे नामवंत तज्ज्ञ डॉक्टर्सकडून कर्करोग निदान व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या शिबिराचा लाभ घ्यावा अस आवाहन दीपकभाई केसरकर मित्र मंडळाच्यावतीनं बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, नंदू शिरोडकर, आबा केसरकर, सुजित कोरगावकर यांसह पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी केले आहे.