CM एकनाथ शिंदे गटात प्रवेशाचे आता देवगडात वारे !

Edited by: नागेश दुखंडे
Published on: August 13, 2023 15:17 PM
views 281  views

देवगड :  'उद्धव बाळासाहेब ठाकरे'यांच्या  पक्षाला अनेक शिवसैनिकांनी आता पर्यंत सोडत,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला. आता हेच चित्र देवगड-जामसंडे नगरपंचायती मध्ये दिसू लागले आहे. त्यामुळे देवगड शहरात अशा चर्चांना ऊत आल्याचे दिसत आहे. त्यात किती खरे आणि किती खोटे हा कोड्याचाच विषय आहे. परंतु लवकरच प्रवेश कार्यक्रमाची प्रक्रिया होणार आल्याचे बोलले जाते आहे. त्यामुळे शिवसेना नेते सावध झाले आहेत. देवगडात शिवसेनेच्या नेते कार्यकर्त्यात अशी अफवा पसरवून त्यांच खच्चीकरण करण्याचे प्रयत्न जवळपास सुरू आहेत. त्यात जेवढी दुफळी माजेल ते सर्व शेवटी भाजपच्याच पथ्यावर पडन्याची चिन्हे दिसत आहेत. यात तिळमात्र ही शंका नाही. त्यामुळे रोज अश्या प्रकारच्या नव नव्या वावढ्या उठविल्या जात आहेत.आता देवगड नगरपंचायत सत्ताधारी पक्षातील शहराचे प्रमुख शिंदे गटात जाणार अशी चर्चा शहरात जोरदार सुरू आहे.

राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर शिंदे गटाकडून शिवसेनेला संघटना पातळीवर झटके देण्याचा प्रयत्न वारंवार होत आहे.मात्र तालुक्यात शिंदे गटाला फारसे यश मिळाले नसल्याचे चित्र देखील पहावयास मिळत आहे. शहरप्रमुख शिंदे गटात जाणार की नाही हे पाहणे मोठ्या औत्सुक्याचे ठरेल. या सर्व प्रकाराकडे  देवगड शहरवासीयांचे लक्ष्य लागून राहिले आहे. की ह्या नुसत्या वावड्या आहेत. की तारीख ठरली आहे याकडेच शहरातील नागरिकांमधून उलट सुलट चर्चांना उधाण येत असले तरी यामध्ये शहरातील जनतेचे विविध प्रश्न सुटावेत हीचअपेक्षा देवगड येथील सर्वसामान्य नागरिकांची सर्व नगरसेवकांकडून आहे.