CM एकनाथ शिंदे शनिवारी सिंधुदुर्गात

भराडी आईचं घेणार दर्शन
Edited by: देवयानी वरसकर
Published on: February 03, 2023 20:50 PM
views 162  views

सिंधुदुर्गनगरी :  राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शनिवार चार फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शनिवार, दि. 4 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 11.15 वा. चिपी विमानतळ येथे आगमन व मोटारीने आंगणेवाडी, ता. मालवण जि. सिंधुदुर्गकडे प्रयाण. सकाळी 11.45 वा. आई भराडीदेवी मंदीर आंगणेवाडी येथे आगमन. सकाळी 11.50 वा. आई भराडीदेवी दर्शन व राखीव. दुपारी 12.20 वा. आई भराडीदेवी मंदीर येथून मोटारीने ओरोस शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. दुपारी 12.50 वा. ओरोस शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. दुपारी 1.20 वा. ओरोस शासकीय विश्रामगृह येथून मोटारीने चिपी विमानतळाकडे प्रयाण. दुपारी 01.40 वा. चिपी विमातनळ येथे आगमन व राखीव. दुपारी 2.00 वा. चिपी विमानतळ येथून शासकीय विमानाने (VT-APL) मुंबई विमानतळाकडे प्रयाण.