
कुडाळ : राज्यात विधानसभा निवडणूकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातही राजकीय वातावरण तापले आहे. जिल्ह्यात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सावंतवाडीत प्रचारसभा होणार आहे. या दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गावरील कुडाळ तालुक्याच्या हद्दीत असलेल्या झाराप गावात बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरवर मुख्यमंत्री शिंदे यांना काही प्रश्न विचारण्यात आलेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रचारासाठी येणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी उत्तरे द्यावीत, असे या बॅनरवर लिहिले आहे.