
सिंधुदुर्ग : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा बुधवारी, २८ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली असल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली.
या जाहीर सभेमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्यातील भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच नागरिकांशी थेट संवाद साधणार असून, राज्य सरकारच्या कामकाजाचा आढावा घेत आगामी योजना व विकासात्मक मुद्द्यांवर ते मार्गदर्शन करणार आहेत.
या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, खासदार नारायण राणे, मंत्री उदय सामंत, मंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे आणि आमदार दिपक केसरकर उपस्थित राहणार आहेत.
ही जाहीर सभा कणकवली येथे होणार असून, सभेच्या आयोजनासाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरू आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केले आहे.










