दाणोलीत ढगफुटी सदृश पाऊस...!

Edited by: विनायक गावस
Published on: October 10, 2023 20:18 PM
views 985  views

सावंतवाडी : आंबोली घाटाच्या पायथ्याशी असलेल्या दाणोली गावाच्या परिसरात दुपारनंतर ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका दाणोली गावठण परिसराला बसला असून नदीच्या पुराचे पाणी कापणीच्या प्रतिक्षेत असलेल्या भात पिकात शिरल्यामुळे हाता तोंडाशी आलेल्या भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले.

लवू महादेव लटम यांचा नदी लगतचा दगडी संरक्षक कठडा नदीच्या पुराच्या पाण्याबरोबर अक्षरशः वाहून गेला. दाणोली गावठण येथील पूलावर आज पर्यंतच्या इतिहासात प्रथमच तीन फूट उंचीवरून पाणी वाहत होते. या अतिवृष्टीचा फटका पारपोली देवसू, दाणोली, केसरी आदी गावांनाही बसला आहे.