धर्माधिकारी प्रतिष्ठानची महास्वछता !

Edited by: विनायक गावस
Published on: October 01, 2023 17:29 PM
views 82  views

सावंतवाडी : स्वछ भारत अभियानांतर्गत गांधी जयंतीचे औचित्त्य साधून संपूर्ण देशात महास्वछता अभियान राबविण्यात आले . या स्वछता अभियानात डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने शेकडो श्री सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी, देवगड, कणकवली , मालवण, वेंगुर्ला, कुडाळ, बांदा, परुळा या ठिकाणी स्वछता अभियान राबून त्याठिकाणचा कचरा गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली.

यावेळी सावंतवाडी -बेळगाव रोड या भागात स्वछता करण्यात आली. यावेळी सावंतवाडीचे प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर ,मुख्याधिकारी सागर साळुंखे, आरोग्य निरीक्षक  पांडुरंग नाटेकर, पोलिस उपनिरीक्षक शेखर दाभोळकर, नगरपालिकेचे कर्मचारी तसेच डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे शेकडो श्री सदस्य उपस्थित होते.