वुमेन्स कॉलेज - आरपीडी कॉलेजच्यावतीने स्वच्छता अभियान !

Edited by: विनायक गांवस
Published on: February 17, 2024 10:22 AM
views 81  views

सावंतवाडी : वुमेन्स कॉलेज ऑफ  स्टडीज अॅण्ड रिसर्च सावंतवाडी, आरपीडी कॉलेज कॅम्पसच्यावतीने एन.एस.एस विभाग व सर्व विद्यार्थीनी तसेच शिक्षक, प्राध्यापक यांच्या सहभागातून 12 वी  च्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

तसेच आरपीडीचे मुख्याध्यापक जगदीश धोंड यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. स्वच्छता अभियान उपक्रमास CETH संस्थेचे अध्यक्ष संतोष सावंत सर, प्राचार्या सौ. माळकर, मुख्याध्यापक जगदीश धोंड, शांतिनिकेतनचे शिक्षक श्री. वारंग, प्रा. ठाकर आदी मान्यवर उपस्थित होते.