
सावंतवाडी : नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून जिल्ह्यात १० ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यातून तब्बल ८१ टन कचरा गोळा करण्यात आला. समुद्रकिनाऱ्यासोबत रस्त्यांच्या दुतर्फा,शासकीय कार्यालयाच्या ठिकाणी ही मोहीम राबवण्यात आली.
या स्वच्छता मोहिमेत तब्बल २ हजार ३७६ सदस्य सहभागी झाले होते. प्रतिष्ठानच्यावतीने आखण्यात आलेल्या कार्यक्रमा प्रमाणे देशभर स्वच्छतेचा जागर सुरू करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर ही मोहीम राबवण्यात आली. यात सकाळी साडेआठ वाजल्यापासून सदस्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला यात दहा ठिकाणी स्वच्छ करण्यात आली. यातून तब्बल ८१ टन कचरा जमा करण्यात आला. या अभियाना अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील चिवला बिच, मालवण समुद्रकिनारा, कासार्डे येथील श्री महालक्ष्मी मंदीर व श्री विठ्ठलादेवी मंदीर परिसर, तळेरे बसस्थानक, पंचायत समिती वैभववाडी, पी.एच.सी.फोंडाघाट, एस.टी.स्टॅंड कणकवली, पिंगुळी तिठा रस्ता, निमूसगा ते लाईट हाऊस रस्ता, सावंतवाडी उपजिल्हा रूग्णालय, कुणकेश्वर मंदीर परिसर व रस्ता या सर्व ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले.