
सावंतवाडी : गेली ५ वर्षे वारंवार पाठपुरावा करून सुद्धा काही कर्मचा-याचे पी.एफ आणि पगार न झाल्यामुळे आज सावंतवाडी नगरपालिकेच्या ७० हून अधिक कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत कामावर रूजू होणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली. आमदार दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. परंतु, सकारात्मक चर्चा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.
आम्ही गेली अनेक वर्षे काम करत आहोत त्यामुळे दीपक केसरकर यांनी आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे. वारंवार पाठपुरावा करून सुद्धा कोणतीही सकारात्मक भूमिका प्रशासन व ठेकेदारांकडून घेण्यात आलेले नाही. सुरक्षेच्या दृष्टीने हातमोजे, बुट तसेच अन्य साहित्य वेळेत उपलब्ध करून दिले जात नाही. त्यामुळे तशाच परिस्थिती काम करावे लागत आहे अशी कैफियत मांडली. असे त्या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. वारंवार लक्ष वेधून सुद्धा प्रशासन किंवा ठेकेदार दाद देत नाही. त्यामुळे जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही कामावर रूजू होणार नाही अशी भूमिका सफाई मित्रांनी घेतली आहे. यावेळी लवू चव्हाण, सागर खोब्रागडे, बाबू बरागडे, सुनील पाटील, गणपत कदम, तुकाराम नेरकर, संजीवनी शिरसाट , गणेश खोब्रागडे, लवू जाधव, रवींद्र कुनाळकर, बाळा जाधव, जयसिंग धुरी, सचिन लाखे, भारती लाखे, कृष्णा डोईफोडे, विनोद काष्टे, शंकर मयेकर, सखाराम जाधव यांच्यासह कारीवडे कचरा डेपो कंत्राटी सफाई कामगारांमध्ये विकास जाधव, जल्लादिन खान, मनीष कदम ,गोविंद जाधव, सिद्धेश कदम, प्रतीक नाईक, अंजली वेंगुर्लेकर, गौतमी तेंडुलकर, आशा बरागडे, संगीता कदम अनुष्का सलम, दशमी लाड विजय कदम, राजन जाधव, गौरेश वासकर आदी कर्मचारी उपस्थित होते