जागतिक पर्यावरण दिनाच्या औचीत्याने तुळस घाटीची स्वच्छता

नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग आणि वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस व वन परिमंडळ मठचा संयुक्त उपक्रम
Edited by: दिपेश परब
Published on: June 05, 2023 13:29 PM
views 53  views

वेंगुर्ला : जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्याने  नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग आणि वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस तसेच वन परिमंडळ मठ, वेंगुर्ला  यांनी तुळस घाटी परिसरात स्वच्छता उपक्रमाचे आयोजन केलं. वेताळ प्रतिष्ठान आपल्या सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा आणि शैक्षणिक उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपत असते. स्वच्छता  विषयक अनेक अनेक उपक्रम राबवत असते, याच उपक्रमाचा एक भाग व सामाजिक बांधिलकी जपत वेताळ प्रतिष्ठानच्या वतीने नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग आणि वनपरीमंडळ, मठ च्या सहकार्याने तुळस घाटीचा सुमारे ४ किमी चा  परिसर स्वच्छ करण्यासाठी आपला सक्रिय प्रयत्न केला.     

गेली काही वर्षे तुळस घाटी परिसरात अज्ञातांकडून मोठ्या प्रमाणात कचरा फेकला जात आहे. यामुळे वेंगुर्ला ते तुळस मुख्य रस्त्या दरम्यान असलेल्या या निर्मनुष्यवस्तीच्या परिसरात कचऱ्याचे प्रमाण वाढले होते. डोंगर व हिरवळ भाग असल्याने गावातून या भागात मॉर्निग वॉक साठी येणारी माणसे, पाळीव जनावरे, प्रवासी याना  काचा आणि कचऱ्याच्या दुर्गंधी मुळे आरोग्याच्या दृष्टीने धोका निर्माण होत होता. याकडे गांभीर्याने लक्ष देत वेताळ प्रतिष्ठानच्या माध्यमातून श्रमदान करत कार्यकर्त्यांनी तुळस घाटी परिसर स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला. यावेळी स्वच्छते दरम्यान  घरगुती कचरा, प्लॅस्टिकच्या टाकाऊ वस्तू, जुने कपडे, इलेक्ट्रॉनिक टाकाऊ साहित्य, सॅनिटरी पॅड, लहान मुलांचे डायपर, दारूच्या बाटल्या, कीटकनाशकाच्या बाटल्या व पाकिटे, प्लॅस्टिकच्या बाटल्या मोठ्या प्रमाणात आढळून आल्या. अशा प्रकारचा कचरा उचलून तो वर्गीकरण करण्यात आले.  सदर कचरा नगरपरिषद वेंगुर्ला यांनी नेत विशेष सहकार्य केले.

ग्रामपंचायत तर्फे स्वच्छता फलक लावून सुद्धा  बेजबाबदारपणे कचरा फेकण्याची काम अज्ञातांकडून सातत्याने  होत असल्याने प्रतिष्ठान व नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वनरक्षक विष्णु नरळे यांनी कचरा फेकून देण्याच्या शहरी मानसिकतेवर असमाधान व्यक्त करत,प्रतिष्ठान च्या स्वच्छता आणि सामजिक उपक्रमाचा आढवा घेत शुभेच्छा दिल्या.

यावेळी वनरक्षक विष्णु नरळे, वन कर्मचारी संतोष इब्रापुरकर, प्रतिष्ठान चे अध्यक्ष विवेक तिरोडकर, सचिव प्रा.सचिन परुळकर, सागर सावंत, सद्गुरू सावंत, महेश राऊळ,मंगेश सावंत,सुधीर चुडजी,रोहन राऊळ,प्रदीप परुळकर,रोहित गडेकर,सानिया वराडकर,विधी नाईक,प्रज्वल परुळकर,प्रवीण राऊळ,भूमी परुळकर,भार्गवी परुळकर,केशव सावंत,किशोर राऊळ आदी कार्यकर्त्यांनी श्रमदान करत स्वच्छता उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला.