
कुडाळ : पतंजलि च्या उपक्रमातील शैक्षणिक स्थळातील सेवा या निमित्ताने कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयच्या परिसराची पतंजलि योग समितीच्या साधकांनी साफसफाई केली.
पतंजलि योग समिती जिल्हा प्रभारी श्री शेखर बांदेकर यांच्या नेतृत्वाखाली सदर उपक्रम राबविण्यात आला त्यावेळी योगेश येरम, जनार्दन पवार, चंद्रशेखर नाईक, जगन्नाथ प्रभू , प्रभू पंचलिंग , सुरेश चव्हाण, स्वप्नील चव्हाण,यशवंत आरोसकर, विलास परब, यशवंत नाईक , ऋषिकेश राणे, राजेंद्र मुळीक , जयवंती पवार, ज्योती प्रभू , शिल्पा पडते, अलिशा वेतुरेकर, योगिता आरोसकर, वैभवी कावले, वीणा परब , गायत्री सरंगले, निशिगंधा कोरगावकर, शारदा वजराटकर, ऋतुजा परब आदि योगसाधक उपस्थित होते. पतंजलि योग समिती सिंधुदुर्गच्या या उपक्रमाबद्दल संत राऊळ महाराज महाविद्यालय कमिटीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.