३२ गडकिल्यांतील माती कलश पुतळा उभारणी पायाभरणीत अर्पण करणार

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: October 30, 2023 20:03 PM
views 121  views

मालवण : मालवण किनारपट्टीवरील किल्ले राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उभारणी होत आहे. चार डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपास्थितीत भव्य दिव्य कार्यक्रम भाजपा आहे. याचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 32 गडकिल्ले येथील माती एकत्रित करून पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य मिरवणुकीने हे माती कलश पुतळा उभारणी पायाभरणी ठिकाणी अर्पण केले जाणार आहेत. 1 नोव्हेंबर रोजी दुपारी हा सोहळा संपन्न होणार आहे अशी माहिती भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर व पर्यटन महासंघ जिल्हाध्यक्ष बाबा मोंडकर यांनी मालवण भाजपा कार्यालय येथे संयुक्त पत्रकार परिषदेत दिली आहे. 

यावेळी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, माजी नगरसेवक दीपक पाटकर, आप्पा लुडबे, गणेश कुशे, पंकज सादये, पूजा सरकारे, चारुशीला आचरेकर, राणी पराडकर, महिमा मयेकर, वैष्णवी मोंडकर, प्रमोद करलकर, पंकज पेडणेकर, ललित चव्हाण, अवी सामंत, कमलेश चव्हाण, नंदू देसाई, कॅलिस फर्नांडीस, विजय चव्हाण, पांजरी, मांजरेकर आदी उपस्थित होते. 

शासकीय स्वरूपातील हा कार्यक्रम असणार आहे. पर्यटन महासंघ यांच्या संकल्पनेतून गडकिल्ल्यावरील माती पूजन करून ही कलशाद्वारे मालवण सागरी महामार्ग येथे आणली जाणार आहे. त्यानंतर शिवप्रेमींच्या उपस्थितीत रॅलीच्या माध्यमातून हे कलश मेढा येथे दाखल होणार आहे. कुशे वाडा याठिकाणी स्वागत केले जाणार आहे. तर मौनीनाथ मंदिरात पूजन करून राजकोट येथील पुतळा उभारणी ठिकाणी 32 किल्ल्यावरील माती कलश आग्नेय दिशेला समर्पित केले जाणार आहेत. 

सागरी पर्यटनाबरोबर मालवण येथील ऐतिहासिक पर्यटन वाढण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम मैलाचा दगड ठरणार आहे. पालकमंत्री यांच्या माध्यमातून किल्ले राजकोट पुनर्जीवीत होत असल्याचा आनंद आहे. यापुढे अन्य किल्ल्यांचा अशाच प्रकारे विकास होईल. जिल्ह्यातील 32 किल्ल्यावरील माती कलशा सोबत महाराष्ट्र गिर्यारोहन महासंघ यांच्यावतीने किल्ले शिवनेरी, किल्ले रायगड येथील मातीही आणली जाणार अशी माहिती बाबा मोंडकर यांनी दिली.