
देवगड : स्वच्छ भारत मिशनच्या दुसर्या टप्प्यांतर्गत केंद्र शासनाने ‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2025’ अंतर्गत जिल्हातील जास्तीत जास्त लोकांनी अभिप्राय नोंदणी करणे गरजेचे आहे . त्यासाठी देवगड तालुक्यातील नागरिकांनी पुढाकार घेऊन स्वच्छ सर्वेक्षण ग्रामिण २०२५ ( SSG 2025 ) हे अॅप डाऊनलोड करून अभिप्राय नोंदवावा असे आवाहन गटविकास अधिकारी देवगड अरुण चव्हाण यांनी केले.
स्वच्छ भारत मिशनच्या दुसर्या टप्प्यांतर्गत केंद्र शासनाने ‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2025’ ही देशव्यापी पडताळणी मोहीम हाती घेतली आहे. या उपक्रमाद्वारे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या स्वच्छतेची पाहणी केली जाणार आहे. यामध्ये केवळ सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनाच्या सुविधा तपासल्या जाणार नसून, घरोघरी जाऊन नागरिकांच्या बदललेल्या मानसिकतेचा आणि स्वच्छतेच्या सवयींचाही आढावा घेणार आहेत.
स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण गुणांकन पद्धत ( एकुन १००० गुण ) असुन ग्रामस्थांच्या प्रतिसादासाठी १०० गुण असुन सिंधुदूर्ग जिल्हा स्वच्छ सर्वेक्षण २०२५ मध्ये अग्रेसर राहण्यासाठी ‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2025’ अंतर्गत देवगड तालुक्यातील जास्तीत जास्त नागरीकांनी अभिप्राय नोंदणी करावी असे आवाहन गटविकास अधिकारी देवगड अरूण चव्हाण यांनी केले .