
सावंतवाडी : शहारत विद्युत प्रवाह खंडित होण्याचे प्रकार वाढल्याने तसेच विविध समस्यांबाबत महावितरणला नागरिकांना धडक दिली. उपअभियंता श्री. राक्षे यांना निवेदन देण्यात आले. वाढिव बील, स्मार्ट मिटर सक्ती न करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
अधिकाऱ्यांना घेराव घालत सावंतवाडी शहरामध्ये सतत खंडित होणारी लाईट तसेच ज्यादा डिपॉझिटची रक्कम मागण्याबाबत नोटिसा पाठवत असल्याबाबत निदर्शनात आणले. स्मार्ट मीटर बसवण्याचं चालू असून त्याबद्दल सक्ती करू नये यासाठी निवेदन दिले. महावितरण अधिकारी यांनी डिपॉझिटची रक्कम भरण्याची सक्ती नाही असं लेखी दिल.
तसेच इतर समस्या पुन्हा उद्भवणार नसल्याच आश्वासन दिलं. यावेळी माजी नगरसेवक सुरेश भोगटे, विकास नारूरकर, महेश नार्वेकर, प्रमोद चितारी, सत्यजित देशमुख, जितेष वेर्णेकर, तन्वीर शहा, विलोरिन डिसोझा आदी उपस्थित होते.