
सावंतवाडी : एडुस्मार्ट इंक सावंतवाडीचा विद्यार्थी चिराग पूजा राजेश चितारी याची मलेशिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय गणित आणि मानसिक अंकगणित स्पर्धेसाठी ( आय. ए. एम. ए.) पुन्हा निवड करण्यात आली आहे. आमच्या ओरोस आणि कणकवली शाखेची मुलेही या स्पर्धेत भाग घेत आहेत.
ही स्पर्धा 2 ऑगस्ट रोजी जोहर बाहरू ( मलेशिया ) येथे होणार आहे. भारतातून फक्त 35 मुले या स्पर्धेत निवडली गेली आहेत. जगभरातून 2000 मुले या स्पर्धेत भाग घेणार आहेत.
चिरागने अबॅकस व मानसिक अंकगणिताचे प्रशिक्षण भटवाडी सावंतवाडी येथील एडुस्मार्ट इंक च्या संचालिका सौ. सपना पिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली घेतले आहे. चिरागच्या या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
अबॅकसच्या अधिक माहितीसाठी संपर्क करा 9665922402