
चिपळूण : सह्याद्री शिक्षण संस्था आय.टी.आयच्या वतीने १७ सप्टेबंर २०२५ ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीमध्ये स्वच्छता पंधरावडा निमित्त स्वच्छता ही सेवा हा उपक्रम कोकण रेल्वेचे सावर्डे स्टेशन या सार्वजनीक ठिकाणी आय. टी. आयच्या सर्व प्रशिक्षणार्थी व कर्मचारी यांच्या सहभागातून परिसराची स्वच्छता करून राबवण्यात आला. या उपक्रमाचे उद्घाटन सावर्डे कोकण रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्तर अतिश गायकवाड व पॉईंटमन मधुकर पवार यांच्या शुभहस्ते श्रीफळ व फित कापून करण्यात आले.
या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवरांचा स्वागत आय.टी.आयचे प्राचार्य उमेश लकेश्री यांच्या हस्ते शाल व श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी बोलताना प्राचार्य उमेश लकेश्री यांनी या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांनमध्ये विद्यार्थी दशेत स्वच्छतेबाबत जागृकता निर्माण करणे आणि सार्वजनिक स्थळे स्वच्छ ठेवण्याची प्रेरणा देणे हा असून आपल्या जीवनात आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छतेबाबत चे महत्व पटवून दिले. तसेच स्वतः स्वच्छता राखून सार्वजनिक ठिकाणी वावरत असताना स्वच्छते संबंधी काळजी घेण्याचे अवाहन केले. आय.टी.आयच्या विविध ट्रेड मधील सुमारे 150 ते 200 प्रशिक्षणार्थी व सर्व कर्मचारी सक्रिय सहभागी होऊन सावर्डे रेल्वे स्टेशन, प्लॅटफॉर्म आणि परिसरातील कचरा गोळा करून ग्रामपंचायत सावर्डे यांच्या घंटागाडीचा वापर करून कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली.
या स्वच्छता कार्यक्रमाप्रसंगी सह्याद्री शिक्षण संस्थेचे संचालक श्री मानसिंग शेठ महाडिक यांनी सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाप्रसंगी ग्रामपंचायत सावर्डे यांची घंटागाडी देऊन सहकार्य केले. कार्यक्रमाच्या शेवटी सावर्डे रेल्वे स्टेशनचे सर्व कर्मचारी, ग्रामपंचायत सावर्डे व सर्व सहभागी प्रशिक्षणार्थी त्यांचे आभार मान्यात आले. व सर्वांना अल्पोहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.










