सह्याद्री आय.टी.आय. सावर्डेत इलेक्ट्रिक व्हेईकल टेक्नॉलॉजी ट्रेनिंग

Edited by: मनोज पवार
Published on: September 21, 2025 19:56 PM
views 221  views

चिपळूण : तालुक्यातील सह्याद्री आय.टी.आय. सावर्डे आणि नाईक, मोटर्स चिपळूण (महिंद्रा अँड महिंद्रा) यांच्या संयुक्त विद्यमाने इलेक्ट्रिक व्हेईकल टेक्नॉलॉजीचे  प्रॅक्टिकल ट्रेनिंग संपन्न झाले. या शिबिराप्रसंगी महिंद्रा अँड महिंद्रा (नाईक मोटर्स),चिपळूण सेल्स कन्सल्टन्स उमेश गुरव,  तेजस वेल्हाळ,  चैतन्य आठल्ये, सैफ कापडी उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत आयटीआय सावर्डेचे प्राचार्य, उमेश लकेश्री यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.

सह्याद्री आयटीआय सावर्डे मध्ये मेकॅनिक मोटर व्हेईकलच्या प्रथम व द्वितीय वर्ष प्रशिक्षणार्थ्यांना अभ्यासक्रमांतर्गत " इलेक्ट्रिक व्हेईकल टेक्नॉलॉजी" हा भाग आहे. स्किल डेव्हलपमेंट नुसार इलेक्ट्रिक व्हेईकल आणि बेसिक प्युअर व्हेईकल यांच्यामध्ये टेक्नॉलॉजी मध्ये कोणता बदल करण्यात आलेला आहे, यानुसार इलेक्ट्रिक व्हेईकल मध्ये कोणत्या प्रकारच्या सिस्टीम वापरण्यात आल्या आहेत. तसेच इंजिन व प्रत्यक्ष बॅटरी ऑपरेटेड व्हेईकल या मार्फत मिळणारा परफॉर्मन्स, बॅटरी चार्जिंग कॅपॅसिटी, आउटपुट, व्हेईकल डिझाईन,सेफ्टी, ऑटोपार्किंग, व्हेईकल मुव्हिंग सिस्टीम, ड्युएल  वायरलेस चार्जिंग, 20 ते 80% फक्त ड्रायव्हर इंटेलेटेड ऑटो लेन चेंज, लेन सेंटरिंग, L2+ADAS- 5 Radars या नवीन टेक्नॉलॉजी संदर्भात सविस्तर माहिती नाईक मोटर्स चिपळूणचे सेल्स कन्सलटन्स तेजस वेल्हाळ यांनी प्रशिक्षणार्थ्यांना दिली. नाईक मोटरर्स, चिपळूण या टीमला धन्यवाद देऊन याप्रसंगी या इलेक्ट्रिक व्हेईकल टेक्नॉलॉजी ट्रेनिंग चा मेकॅनिक मोटार व्हेईकल  प्रशिक्षणार्थ्यांना भविष्यात फायदा होईल असे आपल्या मनोगतात मोटर मेकॅनिक व्हेईकल निदेशक  प्रशांत भिसे यांनी अशी आशा व्यक्त केली. या शिबिरासाठी आय.टी.आय. सावर्डेचे प्राचार्य  उमेश लकेश्री व निदेशक वर्ग उपस्थित होते.