
चिपळूण : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय रत्नागिरी आयोजित तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालित युनायटेड इंग्लिश स्कूलच्या १७ वर्ष वयोगटातील मुलींच्या संघाने अंतिम सामन्यात विजयी ठरून आपला दबदबा कायम राखला.
युनायटेड इंग्लिश स्कूलच्या मुलींनी न्यू इंग्लिश स्कूल सावर्डेच्या संघाचा पराभव करत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली. विजयी संघामध्ये श्रीया हुंबरे, ईश्वरी महाडिक, वैष्णवी महाडिक, सैवी भोबसकर, श्रुती पोसनाक, श्रेया खाडे, पायल अहिरे, सलोनी वाटेकर, प्रज्ञा थोरवडे व इशा जड्याळ यांचा समावेश होता. संघाला क्रीडा प्रमुख श्री. समीर कालेकर व श्री. नितेश जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. व्यवस्थापक म्हणून सौ. सोळुंखे मॅडम व श्री. सोमनाथ सुरवसे यांनी काम पाहिले. विजयी विद्यार्थिनींचे मुख्याध्यापक श्री. विभाकर वाचासिद्ध, उपमुख्याध्यापक श्री. संजय बनसोडे, पर्यवेक्षिका सौ. रेवती कारदगे तसेच परशुराम एज्युकेशन सोसायटीचे सर्व संचालक मंडळ यांनी अभिनंदन करून कौतुक केले.










