
रत्नागिरी : शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालय, खरवते - दहिवलीमधील माजी विद्यार्थ्यी कु. चिराग रमेश घाग याची जिल्हा परीषद, रत्नागिरी अंतर्गत घेण्यात येणार्या नियुक्ती प्रक्रियेमध्ये पंचायत समिती, गुहागर येथील सांख्यिकी विभागात नुकतीच नियुक्ती झाली. कु. चिराग हा शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालयामधील 2023 चा उत्तीर्ण विद्यार्थ्यी असुन त्याच्या ह्या दैदीप्यमान यशाबद्दल चिपळूण - संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार व सह्याद्रि शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष शेखरजी निकम व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनितकुमार पाटील यांनी चिराग यांचे विशेष अभिनंदन केले व त्याला त्याच्या भविष्यातील प्रशासकीय कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.महाविद्यालयामधील सर्व प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारीवर्गातुन चिराग याचे अभिनंदन केलं.