
चिपळूण : विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था व कोकण विभाग नागरी सहकारी पतसंस्था संघ मर्यादित अलिबाग यांचे संयुक्त विद्यमाने अलिबाग जिल्हा रायगड येथे आयोजित सहकारी पतसंस्थांच्या राज्यस्तरीय अधिवेशन आणि 'कोकण भूषण पुरस्कार' 2025 सोहळ्यात, हा प्रतिष्ठित पुरस्कार, चिपळूण तालुका सुवर्णकार नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चिपळूण यांना नुुकताच प्रदान करण्यात आला.
कोकण विभागातील नागरी सहकारी पतसंस्थांचे आर्थिक निकषावर निवडण्यात आलेल्या पतसंस्थांना कोकण पतसंस्था भूषण पुरस्कार 2025 कार्यक्रम, एकत्रित व्यवसाय निकषानुसार ,रुपये पाच कोटी ते 15 कोटी या व्यवसाय गटातून या चिपळूण तालुका सुवर्णकार नागरी सहकारी पतसंस्थेस, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश तथा काका कोयते यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार पतसंस्थेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पवार व शाखाधिकारी धनेय बावधनकर यांनी स्वीकारला त्याप्रसंगी वाशिष्ठी डेअरीचे अध्यक्ष प्रशांत यादव, कोकण नागरी सहकारी पतसंस्था संघ मर्यादित अलिबागचे अध्यक्ष गिरीश तुळपुळे व संचालक, कमल नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अलिबागचे अध्यक्ष व संचालक उपस्थित होते. चिपळूण सुवर्णकार नागरी सहकारी पतसंस्थेचा व्यवसाय 14. 06 कोटी असून गेली 32 वर्ष सातत्याने अ वर्ग नफा व 12 टक्के लाभांश देत असून लवकरच प्रशस्त जागेमध्ये पतसंस्था स्थलांतरित करण्याचे प्रयत्न आहेत आणि हे यश पतसंस्थेचे सभासद ठेवीदार कर्जदार कर्मचारीवृंद आणि सहकारी संचालक माजी संचालक यांचे बहुमोल सहकार्यामुळे मिळाले असल्याचे संस्था पदाधिकाऱ्यांकडून सांगितले आहे.