
चिपळूण : शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय, खरवते-दहिवली येथे डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोलीचे नवनिर्वाचित कुलसचिव डाॅ.संतोष सावर्डेकर यांनी आज सदिच्छा भेट दिली. कुलसचिव पदी नियुक्ती झाले नंतर प्रथमच डाॅ.संतोष सावर्डेकर महाविद्यालयामध्ये आले होते. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनितकुमार पाटील यांनी त्यांचे स्वागत व सत्कार केला.
यावेळी डाॅ.संतोष सावर्डेकर यांनी सह्याद्रि शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व चिपळूण संगमेश्वर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार शेखरजी निकम यांचे विशेष आभार मानत सह्याद्रि परिवाराशी असणार्या जिव्हाळ्याच्या नात्याला उजाळा दिला. स्वर्गीय माजी खासदार गोविंदरावजी निकम साहेबांच्या आशिर्वाद व पाठिंब्यावर आपले सर्व शिक्षण पुर्ण झाले.त्यांनी दिलेला आधार व आपुलकी याला मी कधीही उतराई होवू शकत नाही तसेच आमदार शेखर निकम यांचे सहाय्य मी विसरु शकत नाही असे प्रतिपादन केले. येणार्या काळामध्ये शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालयास माझे संपूर्ण सहकार्य राहील असे आश्वासन दिले.या वेळी सह्याद्रि क्रीडा प्रबोधिनी चे अध्यक्ष अनिरुद्ध निकम, महाविद्यालयाचे कृषि विभाग प्रमुख डाॅ. हरिश्चंद्र भागडे व सर्व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.