सह्याद्री शिक्षण संस्थेच्या फार्मसी कॉलेजचा निकाल ९४.२० टक्के

Edited by: मनोज पवार
Published on: June 24, 2025 12:00 PM
views 40  views

चिपळूण :  सह्याद्री शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (पॉली) सावर्डे चा उन्हाळी  परीक्षा 2025 चा निकाल एकूण 94.20 टक्के लागला. प्रथम वर्षात 61 विद्यार्थ्यांपैकी 58 विद्यार्थी पास झाले. तसेच द्वितीय वर्षात 60 विद्यार्थ्यांपैकी 56 विद्यार्थी पास झाले. प्रथम वर्षात नाखवा मुस्कान - तिसरा क्रमांक-71.80 टक्के , आग्रे रेवती-  द्वितीय -72.30 टक्के, आणि चौगुले इकरा आरिफ- प्रथम- 78.10 टक्के मिळवून उत्तीर्ण झाले. 

अंतिम वर्षात नूर फातिमा- तिसरा  क्रमांक- 79.36टक्के , भोईर चैताली -द्वितीय क्रमांक- 80.36 टक्के , आणि प्रथम क्रमांक- कुंभार  धनश्री-  81.09 टक्के मिळवून उत्तीर्ण झाले. सर्व  यशस्वी विद्यार्थ्यांचे सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व आमदार शेखर निकम ,सेक्रेटरी महेश महाडिक  व सर्व संचालक मंडळ तसेच  कॉलेज कमिटीच्या चेअरमन पूजा ताई निकम ,प्राचार्य  सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून अभिनंदन करून आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.