
देवगड : देवगड तालुक्यात विविध ठिकाणी रंगपंचमी साजरी करण्यात आली लहान मुलांसह महिलांनी रंगपंचमीचा आनंद लुटला व गावागावात मंदिरांमध्ये रंगपंचमी निमित्त पारंपारिक धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले.
सण उत्सव हे कोकणामधील मोठ्या भक्तीने व उत्साहाने साजरे केले जातात सध्या सिग्मोत्सवही मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे रंगपंचमी निमित्त देवगड शहरांमधील बहुतांश ठिकाणी लहान मुलांनी व महिलांनी गुलाल उधळून उत्साहात रंगपंचमी साजरी करून आनंद लुटला तालुक्यातील गावागावा मंदिरांमध्ये ही धार्मिक पद्धतीत रंगपंचमी साजरी करण्यात आली.
यावेळीही ढोल ताशांच्या गजरात रंग उधळून आनंद लुटण्यात आला नैसर्गिक वायूच्या रंगानेच ही रंगपंचमी साजरी करण्यात आली केमिकल वाले कोणतेही रंग वापरण्यात आले नव्हते यामुळे या रंगपंचमीमध्ये लहान मुले वयोवृद्ध व्यक्ती व महिलांनी विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.