
कणकवली : कणकवली पर्यटन महोत्सव २०२३ च्या निमित्ताने नगरपंचायत कणकवली च्या वतीने चित्रकला स्पर्धेचं आयोजन ४ जानेवारी रोजी करण्यात आले आहे.विजेत्या बालकलाकारांना रोख रक्कम स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. ही स्पर्धा तीन गटात होईल. 1-आठवी ते दहावी गट -क, प्रथम क्रमांक 500, द्वितीय क्रमांक 400, तृतीय क्रमांक 300, उत्तेजनार्थ 1- 100,उत्तेजनार्थ 100, 2-चौथी ते सातवी गट ब, प्रथम क्रमांक 400, द्वितीय क्रमांक 300, तृतीय क्रमांक 200, उत्तेजनार्थ 1- 100, उत्तेजनार्थ 100, 3- पहिली ते तिसरी गट अ, प्रथम क्रमांक 300/-,द्वितीय क्रमांक₹200, तृतीय क्रमांक ₹150, उत्तेजनार्थ 100,उत्तेजनार्थ 100, अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या बालकलाकारांनी आपली नावे नगरपंचायत कणकवली येथे किंवा स्वामी आर्ट गॅलरी बाजारपेठ कणकवली येथे दिनांक 3 जानेवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत नोंदवावित. स्पर्धेसाठी प्रवेश विनामूल्य राहील. स्पर्धा दि. 4 जानेवारी रोजी सकाळी दहा ते अकरा या वेळेत घेतली जाईल. स्पर्धकांना कागद नगरपंचायत कडून पुरविला जाईल.स्पर्धकांनी रंग साहित्य स्वतः आणायचे आहे. चित्रांचा विषय स्पर्धा स्थळी दिला जाईल.सहभाग घेणाऱ्या बाल कलाकारांना नगरपंचायत कडून सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल. विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र फ्रेम करून, स्मृतीचिन्ह व रोख रक्कम देऊन महोत्सव स्थळी दिनांक 6 जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात येईल. विजेत्या स्पर्धकांच्या चित्रांचे व काही निवडक चित्रांचे प्रदर्शन कार्यक्रम स्थळी मांडण्यात येईल.या देशाचं भविष्य घडवणाऱ्या बालकांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि कणकवलीच्या सांस्कृतिक वैभवात भर पडावी यासाठी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सर्व बालकलाकारांना स्पर्धेत भाग घेण्याचे आवाहन केलं आहे. अधिक माहितीसाठी संपर्क-शैलजा कदम 8805292596 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.