
बांदा : मडुरा येथील व्ही. एन. नाबर इंग्लिश मिडीयम प्रशालेत बालदिन उत्साहात संपन्न झाला. यानिमित्ताने प्रशालेत विविध मनोरंजनात्मक खेळ व स्पर्धा पार पडल्या. रोणापाल सरपंच सुरेश गावडे यांनी विद्यार्थ्यांना बालदिनाचे महत्त्व विषद केले. यावेळी लोकल कमिटी सदस्य सुरेश गावडे व शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष घनश्याम वालावलकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने उद्घाटन झाले. तसेच माजी पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी विविध मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले. संगीत खुर्ची क्रीडा प्रकारात यशवंत परब विजेता ठरला. ग्लास पिरॅमिड प्रकारात अंश परब प्रथम तर विशांत पेडणेकर याने द्वितीय मिळविला.
लोकमान्य सोसायटीचे उमेश परब यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले. यावेळी सर्वेश प्रभू, साईनाथ काणेकर, ज्ञानेश्वर येडवे, प्रशालेच्या मुख्याध्यापिका प्रतिक्षा शिरोडकर, शिक्षिका वेलांकनी रॉड्रिग्ज, प्राची परब आदी उपस्थित होते. सुत्रसंचलन वेलांकनी रॉड्रिग्ज तर आभार प्राची परब यांनी मानले.