मुलांनी घेतले शेतीचे धडे | एक दिवस बळीराजासाठी

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: July 28, 2024 07:44 AM
views 95  views

मालवण : 'एक दिवस बळीराजासाठी' या जिल्हा परिषदेच्या नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत  प्राथमिक शाळा कोळंब कातवड या शाळेतील मुलांनी प्रगतशील शेतकरी श्री गणपत बागवे याच्या शेतात जाऊन प्रात्यक्षिकासह शेतीविषयक धडे घेतले. यावेळी मुलांनी शेतीविषयक माहिती जाणून घेऊन शेती लागवडीचा अनुभव घेतला.

शालेय मुलांना लहानपणापासून शेतीची आवड निर्माण व्हावी, शेतकऱ्यांविषयी आदर निर्माण व्हावा, शेतीची विविध अवजारे, बियाणे,  लागवाडीच्या विविध पद्धती या संबंधी माहिती व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, माता पालक सदस्या, सर्व विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते.