रायगडच्या पालकमंत्रीपदाचा प्रश्न मुख्यमंत्री सोडवतील : सुनील तटकरे

Edited by: मनोज पवार
Published on: January 23, 2025 20:09 PM
views 109  views

मंडणगड : विधानसभा निवडणूकीत महायूतीस मिळालेल्या प्रचंड यशानंतर राज्याचे मुख्यमंत्र्यांसह प्रमुख मंत्री दावोस येथे परकीय गंतवणुक आणण्यासाठी गेलेले असताना पालकमंत्री पदाबाबत प्रश्न निर्माण करुन मिळालेल्या यशाला गालबोट लावण्याचे कृत्य अनाकलनीय असून महायुतीचे शासनास शोभनीय नसल्याचे स्पष्ट मत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केले. 23 जानेवारी 2025 रोजी मंडणगड तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचेवतीने आयोजीत नागरी सत्कार सोहळ्यानंतर भिंगळोली येथील श्रीकृष्ण सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले.

यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले परस्पर समन्वय राखून पालकमंत्रीपदासह सर्व विषयावरील समस्यांचे समाधान शोधले जाईल यावेळी पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना तालुका व मतदार संघाचे विविध समस्यांवर संवाद साधला व नजीकच्या काळातील विविध प्रश्नांवर भुमिकाही स्पष्ट केली. यामध्ये आंबडवे गावाचे आदर्श संसद ग्राम योजनेसंदर्भात विशेष बैठक आयोजीत करणार असल्याचे सांगीतले. तसेच मंडणगड तालुक्यातील पर्यटन जलमार्ग दळणवळण याबाबत विशेष मंडणगड पर्यटन विकास आरखडा तयार करण्यात येणार असुन त्याबाबतच्या नागरीकांच्या सुचना व प्रस्ताव त्यांचेकडे सादर करण्याचे आवाहन यावेळी केले.

बाणकोट बागमांडला या ठिकाणी जुना पुल पाडून त्याच बाजुला ठिकाणी नव्याने साकारत असलेल्या सागरी सेतूचे बांधकाम फेब्रूवारी महिन्यात सुरु होण्याचे स्पष्ट संकेत दिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, संदीप राजपूरे, तालुकाध्यक्ष मुझफ्फर मुकादम, भाई पोस्टुरे, अजय बिरवटकर, स.तू. कदम, रमेश दळवी, लुकमान चिखलकर, साधना बोथरे, प्रतिक आंबरे, नेहा जाधव, वैभव कोकाटे, सोनल बेर्डे, रेश्मा मर्चंडे पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

समाजमाध्यमावर मंडणगड जिल्ह्यांचे निर्मीती संदर्भात सुरु असलेल्या चर्चेच्या अनुशंगाने खासदार सुनील तटकरे यांच्याकडे प्रश्न विचारला असता, माझ्या माहीतीप्रमाणे असा कुठलाही प्रस्ताव शासन स्तरावर प्रस्तावीत झालेला नसून या संदर्भात कुठलाही निर्णय झालेला नाही नव्याने जिल्हा निर्मीतीसाठी आवश्यक असणारे निकष व या शासनाचा अग्रक्रम यानुसार पुढील निर्णय घेतले जातील.