देवगड जामसंडे नगरपंचायतीतील ४ कोटींच्या कामांना मुख्यमंत्र्यांची मंजुरी : साक्षी प्रभु

Edited by: नागेश दुखंडे
Published on: October 28, 2023 19:06 PM
views 249  views

देवगड : देवगड जामसंडे नगरपंचायतीमधील वैशिष्ट पुर्ण या योजनेअंतर्गत 4 कोटींच्या कामांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे. यासाठी नगराध्यक्ष साक्षी प्रभु व नगरसेवक रोहन खेडेकर यांनी मुख्यमंत्र,शिक्षणमंत्री व उदयोगमंत्रयांकडे पाठपुरावा केला होता. देवगड जामसंडे नगरपंचायतीमधील नगराध्यक्षा साक्षी प्रभु यांनी शिवसेना उबाठा पक्षामधुन शिवसेना शिंदेगटामध्ये नगरसेवक रोहन खेडेकर यांच्यासह दोन महिन्यांपुर्वी पक्ष प्रवेश केला होता. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठया प्रमाणात देवगड जामसंडे नगरपंचायतीला निधी प्राप्त करुन दिला आहे. देवगड जामसंडे नगरपंचायतीमधील प्रभाग क्रमांक 17 या नगराध्यक्षा साक्षी प्रभु यांच्या प्रभागामध्ये 2 कोटीची तर नगरसेवक रोहन खेडेकर यांच्या प्रभाग क्रमांक 7 मधील 2 कोटींच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. तसेच देवगड जामसंडे नगरपंचायतीचा पाणी प्रश्न देखील येत्या काहि दिवसांमध्ये सोडविला जाणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगराध्यक्षा साक्षी प्रभु यांना दिले आहे.

यामध्ये कामांमध्ये देवगड जामसंडे नगरपंचायत हददीतील तारामुंबरी श्री. विठठल रखुमाई मंदीर सभोवताली पेव्हर ब्लॉक स्टील रेलिंग बसविणे,देवगड जामसंडे नगरपंचायत हददीतील देवगड तारामुंबरी तौक्ते वादळामध्ये नुकसान झालेला तारामुंबरी बांध येथील हनुमान मंदिराचा संरक्षक कठडा बांधणे व बेंचेस बसविणे, देवगड जामसंडे नगरपंचायत हददतील देवगड शिवनगर येथील श्री वेसणेकर यांचे घराच्या बाजूला गार्डन बांधणे, देवगड जामसंडे नगरपंचायत हददीतील प्रभाग क्र. 7 मधील समुद्र किनारी बेंचेस बसविणे, देवगड जामसंडे नगरपंचायत हददीतील प्रभाग क्र. 13 मधील सातपायरी येथे पिकअप शेड उभारणे( इंग्लिश मिडीयम स्कुल), देवगड जामसंडे नगरपंचायत हददीतील प्रभाग क्र.13 मधील सातपायरी येथे जेष्ठ नागरिकांसाठी कटटा उभारणे, देवगड जामसंडे नगरपंचायत हददीतील तारामुंबरी ब्रीज येथे स्वागत स्तंभ उभारणे, देवगड जामसंडे नगरपंचायत हददीतील जामसंडे खाकशी तिठा येथे स्वागत स्तंभ उभारणे, देवगड जामसंडे नगरपंचायत हददीतील प्रभाग क्र. 7 मधील जामसंडे मळई उताराचा रस्ता ते मळई मशिदीपर्यंत रस्ता नुतनीकरण करणे, देवगड जामसंडे नगरपंचायत हददीतील प्रभाग क्र. 7 मधील तुळशीकाटे पश्चिम कॉलेज रस्तापासून मणचेकर यांच्या घरापर्यंत रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, देवगड जामसंडे नगरपंचायत हददीतील प्रभाग क्र. 7 मधील तुळशीकाटे कॉलेज रस्ता ते धनाजी मोहिते यांच्या घरापर्यंत जाणारा रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, प्रभाग क्र. 7 मधील जामसंडे कावलेवाउी मुख्य रस्ता ते सहकारनगर गोपणे घरापर्यंत रस्ता नुतनीकरण करणे, प्रभाग क्र. 7 मधील जामसंडे कावलेवाडी मुख्य रस्ता विजय तारकर ते सहकारनगर शिंगे सर यांचे घरापर्यंत रस्ता मजबुतीकरण डांबरीकरण करणे, प्रभाग क्र. 7 मधील जामसंडे सहकारनगर येथील श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय ते मोहन कोयंडे घरापर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, प्रभाग क्र. 7 मधील जामसंडे सहकारनगर येथील श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय ते मोहन कोयंडे घरापर्यंत पाण्याची नवीन पोटलाईन टाकणे, प्रभाग क्र. 7 मधील संदेश मेस्त्री घर ते खाडीपर्यंत जाणारी पायवाटेशेजारी बंदिस्त गटार करणे, प्रभाग क्र. 7 मधील प्रदोष कोयंडे घर खाडीपर्यंत जाणारी पायवाट काँक्रीटीकरण करणे, प्रभाग क्र. 7 मधील विश्वनाथ मेस्त्री घर ते अर्जुन भाबल यांचे घरापर्यंत जाणारी पायवाट काँक्रीटीकरण करणे, प्रभाग क्र. 7 मधील मोहन मेस्त्री घर ते खाडीपर्यंत जाणारी पायवाट काँक्रीटीकरण करणे, प्रभाग क्र. 7 मधील जयवंत मेस्त्री घर ते खाडीपर्यंत जाणारी पायवाट काँक्रीटीकरण करणे. अशी कामे मंजुर करण्यात आली आहेत.

याबददल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिक्षणमंत्री दिपक केसरकर, उदयोगमंत्री उदय सामंत यांच्यामुळे निधी प्राप्त झाल्यामुळे देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा साक्षी प्रभु यांनी आभार मानले आहेत.