अणसुरात छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास

Edited by: दिपेश परब
Published on: March 26, 2025 18:45 PM
views 151  views

वेंगुर्ला : छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास कार्यक्रम अणसुर गावात नुकताच साजरा करण्यात आला. अणसूर सरपंच मित्रमंडळ यांच्या सौजन्याने छत्रपती संभाजी महाराज बलिदान वर आधारित छावा चित्रपट दाखविण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून  शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सिधुदुर्ग जिल्हाप्रमुख मंगेश पाटील, अणसूर गावचे सामाजिक कार्यकर्ते शिंधुदुर्ग शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान गोव्याचे अध्यक्ष मंदार गावडे, सरपंच सत्यविजय गावडे, उपसरपंच वैभवी मालवणकर, सदस्य सीमा गावडे, प्रज्ञा गावडे, साक्षी गावडे, सुधाकर गावडे सामाजिक कार्यकर्ते अनिल गडकर, भाजपा कार्यकर्ते बिट्टू गावडे, सुनील गावडे जेष्ठ नागरिक नवसोजी गावडे, नीलकंठ गावडे, प्रभाकर गावडे, संदेश गावडे, दीपक गावडे, प्रभाकर गावडे, गजमुख गावडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. 

यावेळी सिंधुदुर्ग शिवप्रतिष्ठान प्रमुख मंगेश पाटील याच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व सरपंच सत्यविजय गावडे यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. मंगेश पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरित्र, व बलिदानावर मार्गदर्शन केले. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास म्हणून सर्वांनी उभे राहून दोन मिनिटे श्रद्धांजली वाहिली. सरपंच सत्यविजय गावडे ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमा साठी सहकार्य केले, आर्थिक सहाय्य केले त्यांचे आभार मानले.