सावंतवाडी : मुक्ताई ॲकेडमीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील जिल्ह्यातील मुलांसाठी व मुलींसाठी बुद्धिबळ प्रशिक्षण शिबीराचे आयोजन केले होते. शिबीराचे उदघाटन प्रमुख पाहुणे हस्ताक्षर तज्ञ विकास गोवेकर सर यांच्या हस्ते आणि अनुपमा शेटगे, राष्ट्रीय बुदधिबळ खेळाडू बाळकृष्ण पेडणेकर, ॲकेडमीचे अध्यक्ष कौस्तुभ पेडणेकर, उपाध्यक्षा सौ.स्नेहा पेडणेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
शिबीरात देवगड, कणकवली, कुडाळ, वेंगुर्ले, सावंतवाडी येथून आलेल्या जिल्ह्यातील 54 विदयार्थ्यांनी सहभाग घेतला. सुरुवातीला कौस्तुभ पेडणेकर यांनी ॲकेडमीत नियमित प्रशिक्षण घेणारे पारितोषिक प्राप्त खेळाडू यश सावंत, साक्षी रामदुरकर, गार्गी सावंत, चिदानंद रेडकर आणि नवीन विदयार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी पेडणेकर यांनी पुढील महिन्यापासून होणा-या जिल्हास्तरीय ते राष्ट्रीय स्तरावरील शालेय व इतर स्पर्धां आणि त्यामधून मिळणा-या गुणांबाबत विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले.
विकास गोवेकर मार्गदर्शन करताना म्हणाले की "विदयार्थ्यांनी बुदधिबळ रोज खेळावे.ज्यामूळे एकाग्रता वाढते आणि त्याचा उपयोग अभ्यासामध्ये होतो. मुलं निर्णयक्षम होतात."मुक्ताई ॲकेडमीत पुढील महिन्यात हस्ताक्षर सुधार वर्गाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे या वेळी जाहीर करण्यात आले. सहभाग घेणा-या विदयार्थ्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आली. स्नेहा पेडणेकर यांनी आभार मानले.