मुक्ताई ॲकेडमीतर्फे बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन...!

Edited by: विनायक गावस
Published on: August 07, 2023 12:27 PM
views 157  views

सावंतवाडी : मुक्ताई ॲकेडमीतर्फे रविवार ६ ऑगस्ट रोजी कै.सौ.सरोज सुर्यकांत पेडणेकर यांच्या स्मरणार्थ सावंतवाडी येथे जिल्हास्तरीय बुदधिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.स्पर्धा 20 वर्षाखालील मुलगे आणि 12 वर्षाखालील मुलगे या दोन गटात घेण्यात आली.स्पर्धेचे उदघाटन प्रमुख पाहुणे युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष श्री.दुर्गेश ऊर्फ देव्या रमेश सुर्याजी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी मुक्ताई ॲकेडमीच्या उपाध्यक्षा सौ.स्नेहा कौस्तुभ पेडणेकर, श्रीमती अनुपमा शेटगे उपस्थित होते.स्पर्धेत सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ले, कणकवली, मालवण येथील बावन्न मुलांनी सहभाग घेतला.

प्रमुख पाहुणे श्री.देव्या सुर्याजी मुलांना शुभेच्छा देताना म्हणाले,'मुक्ताई ॲकेडमी मुलांसाठी घेत असलेल्या खेळ व इतर उपक्रमांच्या प्रशिक्षण शिबीर, स्पर्धा यामध्ये मुलांना आपली गुणवत्ता सिदध करता येते.ॲकेडमीच्या या प्रशिक्षणाचा, स्पर्धांचा लाभ सर्व मुलांनी घेतला पाहिजे.'

दोन्ही गटात मिळुन अकरा पारितोषिके, चषक, पदक, प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहेत.सहभाग घेणा-या स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देण्यात येतील.ॲकेडमीच्या उपाध्यक्षा सौ.स्नेहा कौस्तुभ पेडणेकर यांनी आभार मानले.