सामंत ट्रस्ट तर्फे धनादेश प्रदान

Edited by:
Published on: January 28, 2025 18:31 PM
views 178  views

सावंतवाडी : मुंबई येथील सामंत ट्रस्ट तर्फे आज सावंतवाडी येथील डॉ परूळेकर नर्सिंग होम मध्ये डॉ जयेंद्र परुळेकर यांच्या हस्ते गरजूंना धनादेश प्रदान केले. यात पेंडूर येथील देवयानी राऊळ,सातार्डा येथील अनंत सातार्डेकर,बिरोडकर टेंब येथील श्रीकृष्ण बिरोडकर,सातार्डा येथील चंद्रकांत आरोंदेकर,चिंदर येथील बाबुराव कासले आणि शेर्ले येथील बाबू आमोणकर यांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचे धनादेश प्रदान करण्यात आले.कर्करोग, मधुमेह ,मणक्याचे विकार, गुडघेदुखी अशा अनेकविध व्याधींनी पिडित गरजू रुग्णांना हे धनादेश देण्यात आलेले आहेत.