मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांची तपासणी

Edited by:
Published on: February 05, 2024 14:23 PM
views 526  views

सिंधुदुर्ग : रस्ता सुरक्षा अभियान 2024 अंतर्गत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यामार्फत ४ फेब्रुवारीला मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या वाहनचालकांची तपासणी करण्यात आली. सावंतवाडी, कुडाळ व ओसरगाव टोल नाका येथेही तपासणी करण्यात आली. यावेळी एकूण ४५ वाहनचालकांची तपासणी केली. याप्रसंगी मोटार वाहन निरीक्षक मनोज लोणारी, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक केतन पाटील, सिद्धार्थ ओवाळ व वाहन चालक नागेश बंदरकर उपस्थित होते.